जय योगीश्वर दत्त दयाळ| तु ज एक जगमां प्रतिपाळ ||१||
.
|
हे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र या जगामधे
रक्षणकर्ता आहेस. |
*अत्र्यनसूया
करी निमित्त| प्रगट्यो
जगकारण निश्चित||२||*
|
अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखर तु प्रगट
झाला आहेस. |
*ब्रम्हाहरिहरनो
अवतार, शरणागतनो
तारणहार ||३||*
|
तु ब्रम्हा, विष्णु आणि
शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांना तु या भवसागरातुन तारुन नेतोस. |
*अन्तर्यामि
सतचितसुख| बहार सद्गुरु
द्विभुज सुमुख् ||४||*
|
तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्य स्वरुपात दोन हात
आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस. |
*झोळी
अन्नपुर्णा करमाह्य| शान्ति
कमन्डल कर सोहाय ||५||*
|
तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेले
हे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे. |
*क्याय
चतुर्भुज षडभुज सार| अनन्तबाहु
तु निर्धार ||६||*
|
कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस. |
*आव्यो शरणे
बाळ अजाण| उठ दिगंबर
चाल्या प्राण ||७||*
|
मी अजाण बालक तुला शरण आलो आहे. हे दिगंबरा! तू उठ. आता प्राण जाईल अशी
स्थिती आहे |
*सुणी अर्जुण
केरो साद| रिझ्यो
पुर्वे तु साक्शात ||८||*
*दिधी रिद्धि
सिद्धि अपार| अंते मुक्ति
महापद सार ||९||*
|
पुर्वी तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या.
त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते. |
*किधो आजे केम
विलम्ब| तुजविन मुजने
ना आलम्ब ||१०||*
|
मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला
तुझ्याशिवाय कुणाचा आधार नाही. |
*विष्णुशर्म
द्विज तार्यो एम| जम्यो
श्राद्ध्मां देखि प्रेम ||११||*
|
विष्णुशर्मा ब्राम्हणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणि त्यांचा
उद्धार केलास. |
*जम्भदैत्यथी
त्रास्या देव| किधि म्हेर
ते त्यां ततखेव ||१२||*
*विस्तारी माया दितिसुत| इन्द्र
करे हणाब्यो तुर्त ||१३||*
|
जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदत केली होती. तु त्यावेळी आपल्या मायेने
इंद्राकरवी त्या राक्षसाचा वध केला होतास. |
*एवी लीला क इ
क इ सर्व| किधी वर्णवे
को ते शर्व ||१४||*
|
अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्या आहेत. यांचे वर्णन
कोण करु शकेल? |
*दोड्यो आयु
सुतने काम| किधो एने ते
निष्काम ||१५||*
|
आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित) केले. |
*बोध्या यदुने
परशुराम| साध्यदेव
प्रल्हाद अकाम ||१६||*
|
यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा
प्रल्हादाला तु उपदेश केला होता. |
*एवी तारी
कृपा अगाध| केम सुने ना
मारो साद ||१७||*
|
अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु
माझी हाक मात्र का ऐकत नाहीस? |
*दोड अंत ना
देख अनंत| मा कर अधवच
शिशुनो अंत ||१८||*
|
हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस. या बालकाचा असा
मधेच अंत करु नकोस. |
*जोइ द्विज
स्त्री केरो स्नेह| थयो
पुत्र तु निसन्देह ||१९||*
|
ब्राम्हण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास. |
*स्मर्तृगामि
कलिकाळ कृपाळ| तार्यो धोबि
छेक गमार ||२०||*
|
स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे
तारुन नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण
उद्धारले आहेस. |
*पेट पिडथी
तार्यो विप्र| ब्राम्हण शेठ
उगार्यो क्षिप्र ||२१||*
|
पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस, आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस. |
*करे केम ना
मारो व्हार| जो आणि गम
एकज वार ||२२||*
|
मग देवा, तु माझ्या
मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच
माझ्याकडे पहा! |
*शुष्क
काष्ठणे आंण्या पत्र| थयो
केम उदासिन अत्र ||२३||*
|
वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्र तु का
उपेक्षा करत आहेस |
*जर्जर
वन्ध्या केरां स्वप्न| कर्या
सफळ ते सुतना कृत्स्ण ||२४||*
|
हे देवा, वृद्ध वंध्या
स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस, तिचे मनोरथ पुर्ण केलेस. |
*करि दुर
ब्राम्हणनो कोढ| किधा पुरण
एना कोड ||२५||*
|
दत्तात्रेय प्रभू! तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छा पुर्ण
केलीस. |
*वन्ध्या भैंस
दुझवी देव| हर्यु
दारिद्र्य ते ततखेव ||२६||*
|
हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राम्हणाचे दारिद्र्य दूर
केलेत. |
*झालर खायि
रिझयो एम| दिधो सुवर्ण
घट सप्रेम ||२७||*
|
श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन,
आपण त्या ब्राम्हणाला प्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात. |
*ब्राम्हण स्त्रिणो
मृत भरतार| किधो संजीवन
ते निर्धार ||२८||*
|
ब्राम्हण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस. |
*पिशाच पिडा
किधी दूर| विप्रपुत्र
उठाड्यो शुर ||२९||*
|
पिशाच्च पीडा दुर करुन, तु
मृत ब्राम्हण पुत्र पुश्च जीवंत केलास. |
*हरि विप्र मज
अंत्यज हाथ| रक्षो भक्ति
त्रिविक्रम तात ||३०||*
|
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राम्हणाचे गर्वहरण केलेस आणि
त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस. |
*निमेष मात्रे
तंतुक एक| पहोच्याडो
श्री शैल देख ||३१||*
|
तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुन दिलेस. |
*एकि साथे आठ
स्वरूप| धरि देव
बहुरूप अरूप ||३२||*
*संतोष्या निज भक्त सुजात| आपि
परचाओ साक्षात ||३३||*
|
हे प्रभो, तु निर्गुण
असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस. त्यामुळे एकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु
सर्व भक्तांना संतुष्ट केलेस आणि
आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली. |
*यवनराजनि
टाळी पीड| जातपातनि तने
न चीड ||३४||*
|
हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तु जातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक
करत नाहीस हे दाखवुन दिलेस. |
*रामकृष्णरुपे
ते एम| किधि लिलाओ
कई तेम ||३५||*
|
हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेक लीला केल्या आहेस. |
*तार्या पत्थर
गणिका व्याध| पशुपंखिपण
तुजने साध ||३६||*
|
दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इ.चा पण तु उद्धार केल आहेस.
पशु पक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत. |
*अधम ओधारण
तारु नाम| गात सरे न शा
शा काम ||३७||*
|
हे देवा, तुझे
नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे. तुझे नामस्मरण केल्याने कुठले काम होत
नाही? |
*आधि व्याधि
उपाधि सर्व| टळे
स्मरणमात्रथी शर्व ||३८||*
|
हे शिवशंकरा, तुझ्या
नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि
सर्व उपाधी नष्ट होतात. |
*मुठ चोट ना
लागे जाण| पामे नर
स्मरणे निर्वाण ||३९||*
|
तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ. प्रकारचा त्रास होत नाही, आणि मनुष्य मोक्षपद प्राप्त करतो. |
*डाकण शाकण
भेंसासुर| भुत पिशाचो
जंद असुर ||४०||*
*नासे मुठी दईने तुर्त| दत्त
धुन सांभाळता मुर्त ||४१||*
|
या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण,
शाकिण, महिषासुर, भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात. |
*करी धूप गाये
जे एम| दत्तबावनि आ
सप्रेम ||४२||*
*सुधरे तेणा बन्ने लोक| रहे
न तेने क्यांये शोक ||४३||*
*दासि सिद्धि तेनि थाय| दुःख
दारिद्र्य तेना जाय ||४४||*
|
जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकी सौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती
होते. त्याला कोणत्याही प्रकारचे दु:ख रहात नाही. सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही
दारिद्र्य प्राप्त होत
नाही. |
*बावन
गुरुवारे नित नेम| करे पाठ बावन
सप्रेम ||४५||*
*यथावकाशे नित्य नियम| तेणे
कधि ना दंडे यम ||४६||*
|
जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचे बावन्न पाठ श्रद्धापुर्वक
करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठ करतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही. |
*अनेक रुपे एज
अभंग| भजता नडे न
माया रंग ||४७||*
|
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त प्रभुंची
उपासना करतांना माया-मोह त्रास देत
नाहीत. |
*सहस्त्र नामे
नामि एक| दत्त दिगंबर
असंग छेक ||४८||*
|
दत्तात्रेयाला अनेक विध नामे असुनही तो मात्र दत्त दिगंबर एकच अाहे आणि तो
सर्व माया मोहापासुन दूर अलिप्त आहे. |
*वंदु तुजने
वारंवार| वेद श्वास
तारा निर्धार ||४९||*
|
हे प्रभो, मी तुला
वारंवार वंदन करीत आहे. चारही वेद आपल्या श्वासातुनच प्रगट झाले आहेत हे
निश्चित! |
*थाके
वर्णवतां ज्यां शेष| कोण
रांक हुं बहुकृत वेष ||५०||*
|
जेथे हे दत्तात्रेया, तुझे
वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो, तेथे
अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या
पामराची
काय कथा? |
*अनुभव
तृप्तिनो उद्गार| सुणि हंशे ते
खाशे मार ||५१||*
|
दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत. टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणी याकडे
पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल. |
*तपसि तत्वमसि
ए देव| बोलो जय जय
श्री गुरुदेव | बोलो जय जय श्री गुरुदेव ||५२||*
|
श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच
निर्गुण ब्रम्हस्वरुप आहेत. म्हणुन सर्वांनी आवर्जुन ‘जय जय श्री गुरुदेव’ म्हणावे.
|